भारत सरकार• महाराष्ट्र शासन •Maharashtra Police
Maharashtra Police · Amravati Range पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र Office of the Special Inspector General of Police, Amravati Range
ताज्या घडामोडी
अवैध गुटखा विक्रीवर मोठी कारवाई; ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त सायबर फसवणुकीपासून सावध राहा — तक्रारीसाठी १९३० वर संपर्क करा प्रेस नोट : आंतरराज्यीय वाहन चोरट्यांची टोळी जेरबंद जिल्हा लिपिक संवर्गातील वरिष्ठ श्रेणी लिपिक यांची तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत पोलीस शिपाई भरती २०२६ — मैदानी चाचणी गुणपत्रक प्रसिद्ध प्रेस नोट : वाशिम येथे एमपीडीए अंतर्गत कारवाई पोलीस महानिरीक्षक यांची पोलीस ठाण्यांना अचानक भेट वार्षिक तपासणीबाबत परिपत्रक अवैध गुटखा विक्रीवर मोठी कारवाई; ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त सायबर फसवणुकीपासून सावध राहा — तक्रारीसाठी १९३० वर संपर्क करा प्रेस नोट : आंतरराज्यीय वाहन चोरट्यांची टोळी जेरबंद जिल्हा लिपिक संवर्गातील वरिष्ठ श्रेणी लिपिक यांची तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत पोलीस शिपाई भरती २०२६ — मैदानी चाचणी गुणपत्रक प्रसिद्ध प्रेस नोट : वाशिम येथे एमपीडीए अंतर्गत कारवाई पोलीस महानिरीक्षक यांची पोलीस ठाण्यांना अचानक भेट वार्षिक तपासणीबाबत परिपत्रक

अमरावती परिक्षेत्राचा परिचय

पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र — सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

परिक्षेत्राचा परिचय

महाराष्ट्र राज्याची पोलीस प्रशासनाची रचना परिक्षेत्र आणि जिल्हा या स्तरांवर विभागली गेली आहे. अमरावती परिक्षेत्राची स्थापना महाराष्ट्र शासन, गृह विभागाच्या २६ एप्रिल १९७३ रोजीच्या ठरावानुसार १ मे १९७३ पासून करण्यात आली. परिक्षेत्राचे मुख्यालय अमरावती येथे असून पोलीस महानिरीक्षक (IGP) या परिक्षेत्राचे प्रमुख आहेत.

अमरावती परिक्षेत्रात खालील पोलीस घटकांचा समावेश होतो — अमरावती शहर पोलीस आयुक्तालय, तसेच अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ हे जिल्हे. परिक्षेत्रांतर्गत एकूण 147 पोलीस ठाणी कार्यरत आहेत.

परिक्षेत्र कार्यालयाचे प्रमुख कार्य कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा आढावा घेणे, तपासाच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजावर देखरेख ठेवणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करणे हे आहे.

ध्येय व कार्यक्षेत्र

  • नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे.
  • गुन्ह्यांचे प्रभावी नियंत्रण, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून तपासाची गुणवत्ता वाढवणे.
  • महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपक्रम राबवणे.
  • अमली पदार्थ, अवैध व्यवसाय, वाळू माफिया व सायबर गुन्ह्यांविरुद्ध सातत्याने कारवाई करणे.
  • नागरिक-पोलीस संबंध दृढ करण्यासाठी जनसंवाद, जनजागृती व तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करणे.
  • पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व जबाबदार पोलीस प्रशासन उभारणे.

पोलीस महानिरीक्षक यांचा संदेश

डॉ. महेश पाटील (भा.पो.से.)
डॉ. महेश पाटील (भा.पो.से.) पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र

अमरावती परिक्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्न, अमली पदार्थ विरोधी मोहीम आणि सायबर गुन्ह्यांविरुद्ध जनजागृती या चार अग्रक्रमांवर आमचे पथक काम करत आहे.

नागरिकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार, माहिती किंवा सूचना असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. आपले सहकार्य हेच सुरक्षित अमरावती परिक्षेत्राचे खरे बळ आहे.

डॉ. महेश पाटील (भा.पो.से.)
पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र

संघटनात्मक रचना

स्तरपदजबाबदारी
परिक्षेत्रपोलीस महानिरीक्षकपरिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांची देखरेख व समन्वय
जिल्हा / शहरपोलीस अधीक्षक / पोलीस आयुक्तजिल्हा पोलीस प्रशासनाचे प्रमुख
उपविभागअपर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारीउपविभागातील पोलीस ठाण्यांची देखरेख
पोलीस ठाणेपोलीस निरीक्षकठाणे कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था
तपास पथकसहायक पोलीस निरीक्षक / उपनिरीक्षकगुन्ह्यांचा तपास व तक्रार निवारण

परिक्षेत्र एका दृष्टिक्षेपात

पोलीस घटकप्रमुखनियंत्रण कक्षपोलीस ठाणी
अमरावती शहर पोलीस आयुक्त 0721-2551000 22
अमरावती ग्रामीण श्री. निकेतन कदम (भा.पो.से.) 0721-2665041 31
अकोला श्री. अर्चित चांदक (भा.पो.से.) 0724-2445333 26
बुलढाणा पोलीस अधीक्षक 07262-242400 24
वाशिम श्री. निकेश खतमोडे (भा.पो.से.) 07252-234834 14
यवतमाळ पोलीस अधीक्षक 07232-256700 30

टीप: येथील आकडेवारी प्रशासकीय पॅनेलमधून अद्ययावत केली जाते. अधिकृत आकडेवारीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.