Government of India• Government of Maharashtra •Maharashtra Police
Maharashtra Police · Amravati Range Office of the Special Inspector General of Police, Amravati Range पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र
Latest Updates
News महत्त्वाचे

Major crackdown on illegal gutkha sale

Major crackdown on illegal gutkha sale

पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या निर्देशानुसार अमरावती परिक्षेत्रातील तीन जिल्ह्यांत एकाचवेळी छापे.

पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्या निर्देशानुसार अवैध व्यवसाय विरोधी विशेष मोहिमेंतर्गत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यांत एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला.

एकूण ४२ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून १८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

नागरिकांनी अशा प्रकारची माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा ११२ वर कळवावे. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल.

← Back to list — News