Government of India• Government of Maharashtra •Maharashtra Police
Maharashtra Police · Amravati Range Office of the Special Inspector General of Police, Amravati Range पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र
Latest Updates
News

IGP makes surprise visits to police stations

IGP makes surprise visits to police stations

परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी डॉ. महेश पाटील यांनी अचानक भेटी दिल्या.

पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र डॉ. महेश पाटील यांनी अकोला व वाशिम जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांना अचानक भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी नागरिकांकडून प्राप्त तक्रारींची दखल घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ठाणे परिसराची स्वच्छता, कैद्यांसाठीची व्यवस्था, तक्रार नोंदणी नोंदवह्या व गस्तीचे नियोजन यांची तपासणी करण्यात आली. त्रुटी आढळलेल्या ठिकाणी तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.

नागरिकांना ठाण्यात येऊन तक्रार दाखल करण्यास कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

← Back to list — News