बातम्या
दिवाळी सुरक्षा मोहिमेत २,८०० कारवाया
Diwali safety drive
अमरावती परिक्षेत्रात फटाके विक्री, वाहतूक व गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष बंदोबस्त.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत विशेष सुरक्षा बंदोबस्त लागू करण्यात आला होता. बाजारपेठा, फटाके विक्री केंद्रे व प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
एकूण २,८०० हून अधिक कारवाया करण्यात आल्या असून फटाक्यांची अवैध विक्री, आवाजाची मर्यादा व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. सणाच्या काळात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.